सर्व कर्मांसाठी अधिष्ठान, कर्ता, करण, विविध प्रयत्न, दैव हे हवेत !
१. अधिष्ठान : ‘आधारक्षेत्र. जे कर्म करायचे, त्यासाठी तेथे रहाण्यासाठी जे स्थान पाहिजे, त्याला ‘अधिष्ठान’ म्हटले आहे.
२. कर्ता : कर्म करणारा कुणीतरी हवा आणि तो कर्ता असतो. प्रयत्न आणि दैव यांच्यापेक्षा कर्त्यांचे महत्त्व विशेष आहे; कारण प्रयत्न आणि दैव इत्यादींचे हीनत्व कर्ता स्वतःच्या कौशल्याने दूर करतो.
३. करण : कर्त्याला काम करतांना जी साहाय्यक साधने होतात, त्यांना ‘करण’ म्हटले आहे. चित्रकाराची साधने रंग, फलक, ब्रश इत्यादी ही साधने जितकी चांगली असतील, तितके कार्य चांगले होईल आणि कर्त्यांची शक्ती साधनांचे दोष दूर करण्यात वाया जाणार नाही.
४. विविध प्रयत्न : काम करतांना साधने हाताशी घेऊन कर्ता प्रयत्नांनी कार्यसिद्धी साधतो. अधिष्ठान कर्ता, साधने आणि दैव अनुकूल असूनही प्रयत्न केले नाहीत, तर कार्यसिद्धी होत नाही. दैव हे प्रमाण मानणार्यांनी कर्त्याच्या प्रयत्नांचे महत्त्व ओळखले पाहिजे; कारण त्या प्रयत्नांविना कार्य होणे संभवनीय नाही.’
– डॉ. लुकतुके (साभार : मासिक ‘भाग्यनिर्णय’)