देशासमोरील समस्यांवर आपल्यालाच उपाय शोधायचे आहेत ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
देश स्वतंत्र होऊन ७ दशके होऊनही देशापुढील समस्या न्यून न होता वाढतच चालल्या आहेत. याला आतापर्यंत सत्तेत असलेले शासनकर्ते उत्तरदायी नव्हेत का ? – संपादक
मुंबई – देशासमोर अनेक समस्या असून त्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय आहे, असा लोकांनी निष्कर्ष काढला पाहिजे, अशी पक्षबांधणी करायची आहे. समाजावर जे अन्याय-अत्याचार झाले, त्याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हवी. समाजातील उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून द्यायला हवा, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत.