सनातनच्या साधकांना मिळणारे कल्पनातीत आध्यात्मिक ज्ञान !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्ञानाविषयी मार्गदर्शन
‘कथा आणि कादंबर्या यांमधून मांडण्यात येणार्या संकल्पना काल्पनिक असतात. त्यात मांडलेल्या विचाराला विज्ञानाचा आधार नसतो. सध्याचा भ्रमणभाषचा शोध हा १८ – १९ व्या शतकातील लोकांसाठी कल्पनातीत होता. काल्पनिक आणि कल्पनातीत या दोन शब्दांमध्ये असा भेद आहे. तशाच प्रकारे सनातनच्या काही साधकांना मिळणारे विविध विषयांवरील ज्ञान हे ‘कल्पनातीत’ आहे. या ज्ञानात दिलेली एखाद्या घटनेमागील आध्यात्मिक कारणमीमांसा वाचल्यावर प्रथम ‘असेही असू शकते ! मी याची कधी कल्पनाही केली नव्हती !’, असाच विचार मनात येतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.११.२०२१)