मिशनर्‍यांच्या प्रभावामुळे हिंदु कुटुंबाचे विदेशी भाषा, वेशभूषा, रीती-रिवाज यांद्वारे विघटन

पाश्चात्त्यांनी ओळखलेले ख्रिस्ती धर्माचे खरे स्वरूप भारतातील हिंदूंना लक्षात येईल, तो सुदिन !

१. ‘विश्वातील कोणत्याही धर्माने एवढा निरर्थक, अवैज्ञानिक, परस्परविरोधी आणि अनैतिक गोष्टी यांचा उपदेश दिला नाही, जितका चर्चने दिला.’ – टॉल्सटॉय

२. ‘बायबल जुन्या आणि बुरसट विचारधारेचे, अंधविश्वासाचे एक बंडल आहे.’ – जॉर्ज बर्नाड शॉ

३. ‘मी ख्रिस्ती धर्माला एक अभिशाप मानतो, त्यामध्ये आंतरिक विकृतीची पराकाष्ठा आहे. तो द्वेषभावाने परिपूर्ण आहे. या भयंकर विषाला कोणताही उपाय नाही, ईसाई धर्म गुलाम आणि चांडाळ यांचा पंथ आहे.’ – फिलॉसॉफर नित्शे

४. ‘रोमन कॅथॉलिक चर्चला जेव्हा अल्पमत असते, तेव्हा ते मेंढ्यांप्रमाणे शालीन आणि कोल्ह्याप्रमाणे धूर्त असते. जेव्हा त्याला बहुमत असते, तेव्हा ते प्रभुत्व स्थापित करण्यासाठी चित्त्याप्रमाणे आक्रमक बनून मारण्यास तत्पर असते.’

– जेक.टी. चीक

५. ‘आम्हाला गोमांस भक्षण आणि मदिरा पिण्याची सवलत देणारा ख्रिस्ती (ईसाई) धर्म नको. धर्मपरिवर्तन तर असे विष आहे, जे सत्य आणि मानवाच्या मानवतेला खिळखिळे करते. मिशनर्‍यांच्या प्रभावाने हिंदु कुटुंबाचे विदेशी भाषा, वेशभूषा, रीती-रिवाजांद्वारे विघटन झाले आहे.’ – मोहनदास गांधी

(मासिक ‘ऋषि प्रसाद’, मार्च २००४)