संपूर्ण विश्वात हिंदूंकडून साहित्य, धर्म आणि सभ्यता यांचा प्रसार !
हिंदु धर्माविषयी पाश्चात्त्य विचारवंतांची मते
हिंदु धर्माची महानता पाश्चात्त्यांना कळते; परंतु हिंदूंना कळत नाही, हे हिंदु धर्माचे दुर्दैव !
१. हिंदु धर्मच सर्वश्रेष्ठ
‘मी युरोप आणि आशियातील सर्व धर्मांचे अध्ययन केले आहे; परंतु मला त्या सर्वांपेक्षा हिंदु धर्मच सर्वश्रेष्ठ दिसून आला. मला विश्वास आहे की, एक दिवस संपूर्ण विश्वाला भारतापुढे नतमस्तक व्हावे लागेल.’
– रोमां रोलां
२. हिंदु धर्म पूर्ण, महान आणि वैज्ञानिक
‘मी ८० वर्षांपर्यंत विश्वातील सर्व मोठ्या धर्मांचे अध्ययन केल्यावर मला समजले की, हिंदु धर्मासमान पूर्ण, महान आणि वैज्ञानिक अन्य कोणताही धर्म नाही. जर तुम्ही हिंदु धर्माचा त्याग केला, तर तुम्ही तुमच्या भारतमातेच्या हृदयात सुरा खुपसत आहात.’
– डॉ. ॲनी बेझंट
३. ‘युरोपचे प्रथम दार्शनिक प्लेटो आणि पायथागोरस दोघांनी दर्शनशास्त्राचे ज्ञान भारतीय गुरूंकडून प्राप्त केले आहे.’
– मोनियर विल्यम
४. ‘पाश्चात्त्य दर्शनशास्त्राचे आदिगुरु आर्य ऋषि आहेत, यात संशय नाही.’
– प्रसिद्ध इतिहासज्ञ लॅथब्रीज
५. ‘आपण पक्षपातरहित होऊन योग्य प्रकारे निरीक्षण केल्यास आपल्याला स्वीकारावे लागेल की, संपूर्ण विश्वात हिंदूंनी साहित्य, धर्म आणि सभ्यतेचा प्रसार केला आहे.’
– श्री. डी.ओ. ब्राऊन
(मासिक ‘ऋषि प्रसाद’, मार्च २००४)