४० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली श्री योगिनी देवीची प्राचीन मूर्ती ब्रिटन भारताला परत करणार !

चोरीला गेलेली श्री योगिनी देवीची प्राचीन मूर्ती

लंडन (ब्रिटन) – उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील लोकारी गावातील मंदिरातून ४० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली श्री योगिनी देवीची प्राचीन मूर्ती ब्रिटन भारताला परत करणार आहे. ही मूर्ती ८ व्या शतकातील असल्याचे सांगतिले जात आहे. ‘ही मूर्ती भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे’, अशी माहिती लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिली.

‘आर्ट रिकव्हरी इंटरनॅशनल’ या संस्थेचे संस्थापक मारिनेलो यांना ब्रिटनमधील एक महिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर घरातील वस्तू विकत असतांना ही मूर्ती सापडली होती. त्यानंतर मारिनेलो यांनी भारतातून चोरलेल्या सांस्कृतिक वस्तूंच्या पुनर्प्राप्तीसाठी समर्पित ‘इंडिया प्राइड प्रोजेक्ट’चे सह-संस्थापक विजय कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही मूर्ती ओळखल्यानंतर ही मूर्ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न चालू करण्यात आले होते.