जहाजावरून आलेल्या ४ विदेशी नागरिकांना ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाला नसल्याचे उघड
पणजी, ११ डिसेंबर (वार्ता.) – विदेशातून मालवाहू जहाजातून रशियाचे ३ नागरिक आणि जॉर्जियाचे २ नागरिक गोव्यात आल्यावर कोरोनाबाधित झाले होते. या नागरिकांचे कोरोनाविषयक चाचणीसाठीचे नमुने कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाला आहे का ? हे तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
Goa: Four of five cargo crew test negative for Omicron variant https://t.co/RToOuzs1tw
— EIN Presswire: Shipping & Logistics Newswire (@EINShippingNews) December 12, 2021
या नमुन्यांचा अहवाल आरोग्य खात्याला ११ डिसेंबर या दिवशी प्राप्त झाला आहे आणि यामध्ये ५ पैकी ४ जणांना ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाला नसल्याचे म्हटले आहे, तर उर्वरित एका विदेशी नागरिकाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पुन्हा चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. इंग्लंड येथून विमानाने गोव्यात आलेले अन्य ३ विदेशी नागरिकही कोरोनाबाधित झाले आहेत आणि त्यांचे कोरोनाविषयक चाचणीचे नमुने ‘जिनोमी सिक्वेन्सिंग’साठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.