वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !
‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे. विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
१. वैचारिक आतंकवादाची उदाहरणे
१ ए. ऐतिहासिक गोष्टी आणि राजकारण : आम्ही शेकडो वर्षे झालेली इस्लामी लूट, अत्याचार, धर्मांतर आणि बळजोरी, तसेच ‘काशीच्या मंदिराची मशीद झाली, ताजमहाल हे शिवमंदिर होते’, यांविषयी बोलतो, तेव्हा विरोधक म्हणतात, ‘या जुन्या गोष्टी आहेत. हा ‘सर्वधर्मसमभावी इंडिया’ आहे. इतिहासाचा किस काढून तुम्ही राजकारण करू नका.’ जेव्हा इस्लामी आक्रमणांच्या पूर्वी कधीतरी आर्यांचे द्रविडांवर आक्रमण झाल्याचे म्हटले जाते. त्याचे पुरावेही नाहीत आणि तो सिद्धांत कितपत खरा आहे, अशी शंकाही निर्माण होते. तरीही अनार्य अस्मिता जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ‘आर्यांनी द्रविडांवर आक्रमण केले, याचा न्यूनगंड समाजाच्या मनात निर्माण व्हावा’, असा प्रयत्न केला जातो. तेव्हा मात्र हे लोक ‘इतिहास सोडून द्या, त्याचे राजकारण करू नका. हा नवीन भारत आहे’, असे म्हणत नाहीत.
१ ऐ. हिंदु आणि इस्लाम धर्म : ते म्हणतात, ‘धर्म ही अफूची गोळी आहे. त्यामुळे महिलांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश मिळाला पाहिजे.’ मग आपण म्हणतो की, मुसलमान महिलांना मशीद किंवा दर्गा येथे प्रवेश मिळावा; म्हणून एकत्र आंदोलन करूया. मग ते म्हणतात, ‘तुम्ही हिंदू आहात. त्यामुळे आमच्या धर्मातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आधी आम्ही प्रयत्न करणार.’ याचा अर्थ हिंदूंच्या संदर्भात ‘धर्म हीच अफूची गोळी’ आणि इस्लामच्या संदर्भात विषय आला की, दुटप्पी भूमिका घेतली जाते.
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)