‘ट्विटर’ची हिंदूंसमवेत असणारी पक्षपाती वागणूक !
‘इस्कॉन आणि काही हिंदू हे बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांविषयी वाचा फोडण्यासाठी ट्विटरवर माहितीसह आक्रमणाची काही छायाचित्रे प्रसारित करत होते; परंतु ‘हे ‘ट्वीट्स’ पुसल्याविना त्यांची खाती चालू ठेवणार नाही’, अशी धमकी ट्विटरने दिली. म्हणजे धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी जर हिंदूंनी ‘ट्विटर हँडल’चा उपयोग केला, तर त्याला मात्र ट्विटरने विरोध करायचा. ट्विटरने ‘इस्कॉन, बांगलादेश’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांचे खाते बंद केले. ट्विटरप्रमाणे अन्य सर्व बांगलादेशी प्रसारमाध्यमे आणि वृत्तवाहिन्या यांनीही हिंदूंवरील अत्याचाराची वृत्ते जगासमोर येऊ नयेत, यासाठी प्रयत्न केला.
ट्विटरचा हिंदूंना एक न्याय आणि आतंकवाद्यांना दुसरा न्याय आहे. जिहादी आतंकवादी समर्थक डॉ. झाकीर नाईक याचे ट्विटर खाते अजूनही चालूच आहे. आतंकवादी कारवाया केल्याने ज्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालण्याचे काम चालू आहे, तिचे ट्विटर खाते चालू आहे; मात्र धर्मप्रेमी हिंदू आणि हिंदूंना धर्मप्रसार अन् आध्यात्मिक ज्ञान देणार्या संघटना यांची ट्विटर खाती कधीच बंद केलेली आहेत.
असे असतांनाही भारतात प्रतिदिन वृत्तपत्रांमधून बांगलादेशची भयावह स्थिती समजत होती.’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय