दोन डोस असल्याविना शिधावाटप केंद्रात धान्य मिळणार नाही !
सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय
सोलापूर – कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास संबंधितांचे शिधावाटप केंद्रातील धान्य बंद करण्यासमवेतच महापालिका, सेतू कार्यालय, झोन कार्यालय, बीग बझार, डी-मार्ट आणि सरकारी कार्यालय येथे प्रवेशबंदी करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ९ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हा पुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या.
कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘ओमिक्रॉन’ नावाच्या नव्या कोरोना व्हेरियंटची सध्या भीती आहे. सध्या सोलापूरच्या ग्रामीण भागात ६ लाख, तर शहरी भागातील २ लाख नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही.