संरक्षणदल प्रमुख बिपीन रावत यांच्या निधनावर गोव्यातील अविनाश तावारिस यांनी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसांत दुसरी तक्रार प्रविष्ट

फोंडा, ११ डिसेंबर (वार्ता.) – भारताच्या संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे ८ डिसेंबर या दिवशी अपघाती निधन झाल्यानंतर अविनाश तावारिस या ख्रिस्त्याने त्याच्या ‘फेसबूक टाईम लाईन’वर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याच्या प्रकरणी गोव्यात पोलिसांकडे दुसरी तक्रार प्रविष्ट झाली आहे. अविनाश तावारिस यांच्या विरोधात फोंडा येथील जागरूक नागरिक विनय तळेकर यांच्यासह एकूण २७ जणांनी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. ९ डिसेंबर या दिवशी कावरे, केपे येथील मयूर देविदास यांनी अविनाश तावारिस यांच्या विरोधात केपे पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. अविनाश तावारिस यांनी प्रसारित केेलेली ‘पोस्ट’ स्वीकारार्ह नाही आणि यांमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. या ‘पोस्ट’मुळे देशप्रेमी भारतियांच्या भावना दुखावल्या जाऊन गोव्यात दंगली घडू शकतात. या प्रकरणी संशयितावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.