पाकिस्तानच्या लाल मशिदीमध्ये मुलींना दिले जात आहे ईशनिंदेच्या आरोपीचा शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण !
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी ईशनिंदेच्या आरोपावरून श्रीलंकेचे नागरिक प्रियांथा कुमार यांची धर्मांधांच्या जमावाने हातपाय तोडून जिवंत जाळून हत्या केली होती. आता ईशनिंदा करणार्यांना कशा प्रकारे ठार करायचे, याचे प्रशिक्षण पाकच्या एका मशिदीमध्ये मुलींना देण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. पाकमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते गुल बुखारी यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.
Pak के मस्जिद में लड़कियों को दी जा रही ‘सिर कलम करने’ की ट्रेनिंग, इस्लाम के अपमान पर ‘बदला लेने’ का तरीका: Video आया सामने#Pakistan #Mosquehttps://t.co/kP0VdULmmO
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 11, 2021
गुल बुखारी यांनी म्हटले आहे, ‘इस्लामाबादच्या लाल मशिदीत विद्यार्थी ईशनिंदा करणार्या व्यक्तीची हत्या करण्याचा सराव करत आहेत.’ या व्हिडिओमध्ये शेकडो मुली आणि महिला धार्मिक कपडे घालून उभ्या असलेल्या दिसत आहेत. मुलींच्या समोर महिला तलवार घेऊन एका पुतळ्याचा शिरच्छेद करत आहेत.