घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !
१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पानुसार साधकांनी गतीने ग्रंथसेवा केल्यास त्याद्वारे समष्टी साधना झाल्याने त्यांचे आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती शीघ्र होऊ शकणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिकाधिक ग्रंथांची निर्मिती करून त्याद्वारे समाजाला साधक बनवणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ समष्टी साधना आहे !’ अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथनिर्मितीचे कार्य अधिक गतीने करण्याच्या दृष्टीने एकप्रकारे अव्यक्त संकल्पच झालेला आहे. यानुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेतील साधकांनी ग्रंथनिर्मिती अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथकार्यासाठी केलेल्या अव्यक्त संकल्पाच्या माध्यमातून त्या साधकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळत असल्यामुळे त्यांचे आध्यात्मिक त्रासही लवकर अल्प होत आहेत. सध्या सूक्ष्मातील आपत्काळाची (अनिष्ट शक्तींच्या त्रासांची) तीव्रता वाढत असतांनाही ‘गुरूंच्या संकल्पानुसार तळमळीने सेवा करायचा प्रयत्न केला, तर गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) कार्यरत होण्याचे प्रमाणही कसे वाढते’, हे यातून शिकायला मिळते. यामुळे साहजिकच ग्रंथसेवेच्या माध्यमातून साधकांची आध्यात्मिक उन्नती लवकर होऊ शकते.
परात्पर गुरु डॉक्टर संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी नोव्हेंबर २०२१ पर्यंत ३५० ग्रंथ-लघुग्रंथ यांची १७ भाषांत निर्मिती झाली आहे. अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !
२. ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा !
वरील सर्व सेवांसाठी संगणकाचे जुजबी ज्ञान असणे, तसेच संगणकीय टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. ग्रंथनिर्मितीशी संबंधित सेवा शिकण्यासाठी इच्छुकांना सनातनच्या आश्रमात २ – ३ आठवडे रहाता येईल. पुढे त्यांना सनातनच्या आश्रमात राहून किंवा घरी राहूनही सेवा करता येतील.
या सेवा करू इच्छिणार्यांनी पुढील सारणीनुसार आपली माहिती सनातनच्या साधकांना संगणकीय धारिकेच्या किंवा लिखित स्वरूपात द्यावी आणि साधकांनी ती माहिती आपल्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.
टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३ ४०१.
– पू. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (२३.११.२०२१)