सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका, जन्म आहे तुमचा जगत् कल्याणासाठी ।
सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ८.९.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने ग्रंथांशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी लिहिलेली कविता पुढे दिली आहे.
ही थोर विभूती (टीप १) चैतन्याने झळाळती ।
सनातनचे आहात तुम्ही अमूल्य मोती ।।
‘उपाय गुरु’ नामे ‘भू’वरी तुमची कीर्ती ।
जन्म आहे तुमचा जगत् कल्याणासाठी ।। १ ।।
अंतरात दैवी कार्य करण्याची अद्भुत शक्ती ।
नारायणच (टीप २) करत असे
जणू नारायणाची (टीप ३) भक्ती ।
येथेच येते गुरु-शिष्य नात्याची प्रचीती ।
जन्म तुमचा जगत् कल्याणासाठी ।। २ ।।
प्रेमस्वरूप अन् दिव्य अलौकिक मूर्ती ।
तिने जोडली साधक-हृदयांशी नाती ।।
गुणांचे तुमच्या वर्णन करावे किती ।
जन्म तुमचा जगत् कल्याणासाठी ।। ३ ।।
तुमचा साधनेचा प्रवास आहे दैवी ।
लाभली अनमोल साथ श्रीचित्शक्ति (टीप ४) यांची ।
जन्म तुम्हा उभयतांचा जगत् कल्याणासाठी ।। ४ ।।
या शुभ दिनी एकच प्रार्थना सद्गुरुचरणी ।
आम्हा पामरांनाही घेऊन जावे श्री गुरुचरणी ।। ५ ।।
टीप १ : सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
टीप २ : नारायण स्वरूपाशी एकरूप झालेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
टीप ३ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची
टीप ४ : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार !