सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांनी जतन केलेली १९ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर समर्पित केलेली आणि माणसांप्रमाणे फुलांचे आयुष्यही न्यून-अधिक असते, हे दर्शवणारी शेवंतीची फुले !

‘छायाचित्रातील डावीकडील फूल १९ वर्षांनंतरही चांगले दिसत आहे. उजवीकडील फुलाच्या पाकळ्या गळल्या असल्या, तरी ते फूल सुकून काळे पडलेल्या फुलाप्रमाणे दिसत नाही. हे प.पू. विमल फडके यांच्या भावामुळे झाले आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.१२.२०२१) ॐ

‘११.१२.२००२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर शेवंतीची फुले वाहून त्याचे छायाचित्र काढले होते. त्या वेळी कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांनी मला त्यातील शेवंतीची दोन फुले देऊन मला सांगितले, ‘‘ही फुले श्रीमती फडकेआजींना (आताच्या प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांना) द्या. त्यांचा भाव आहे ना !’’ मी घरी आल्यावर ती फुले आजींना दाखवली. त्यानंतर आमच्यात झालेले संभाषण, मला त्या संदर्भात जाणवलेले सूत्र आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर १९ वर्षांपूर्वी समर्पित केलेली शेवंतीची २ फुले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवरील फुले डबीत ठेवण्यास सांगून ‘गुरुदेवच ती फुले सांभाळतील’, अशी दृढ निष्ठा असणार्‍या प.पू. विमल फडकेआजी !

प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके

मी : कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांनी तुला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर वाहिलेली फुले दिली आहेत.

प.पू. फडकेआजी : हो का, छान आहेत ! (तेव्हा प.पू. आजींना पुष्कळ आनंद झाला होता.) ती फुले परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर वाहिलेली आहेत ना ? मग त्यांच्याच छायाचित्राजवळ ठेव. त्यांनी दिलेली फुले तेच सांभाळतील. (आजींनी ती फुले ठेवायला मला लहानशी डबी आणून दिली.)

परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या चरणांवरील फुले दिली आणि ती ठेवायला डबीही त्यांनीच दिली. सध्या फुले या डबीत ठेव. नंतर आणखीन चांगली डबी मिळाली की, तिच्यात ठेवू. (त्यानंतर वर्ष २००९ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी फुले ठेवण्यासाठी आणखीन चांगली डबी दिली. त्या वेळी ‘सर्वकाही गुरुच देतात’, असा प.पू. आजींचा भाव होता.)

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

२. प.पू. फडकेआजींचा परात्पर गुरुदेवांप्रती असलेला अनन्यभाव !

प.पू. आजींनी त्या फुलांना भावपूर्ण नमस्कार केला. त्या वेळी ‘ती फुले नसून प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण आहेत’, असा प.पू. आजींचा भाव असल्याचे मला जाणवले. यातूनच ‘त्यांची परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा होती’, हे माझ्या लक्षात आले.

३. फुलांकडे पाहून जाणवलेले सूत्र

त्या फुलांकडे पाहिल्यावर ‘त्यांनी स्वतःला गुरुचरणी समर्पित केले आहे’, असे मला जाणवते.

श्रीमती मनीषा गाडगीळ

४. अनुभूती

अ. परात्पर गुरु डॉक्टर, या फुलांना तुमच्या चरणांच्या झालेल्या कोमल स्पर्शामुळे ती फुले पावन झाली आहेत. तुमच्या पवित्र चरणांच्या स्पर्शामुळेच आज १९ वर्षांनंतरही त्या फुलांना शेवतींचा सूक्ष्म गंध येत आहे.

आ. ‘प.पू. फडकेआजींचा भाव आणि आपली कृपा यांमुळेच ती फुले त्यांची साधना करत असून त्यांच्याकडे पाहिल्यावर मन शांत होते’, असे मला वाटते.

‘परात्पर गुरुदेव, १९ वर्षे ती फुले आपणच सांभाळलीत. इथून पुढेही आपणच सांभाळणार आहात. ‘या फुलांप्रमाणेच आम्हा सर्व साधकांनाही आपल्या चरणी समर्पित करून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतीने आणि आर्ततेने प्रार्थना करते.’

परात्पर गुरुदेव आणि प.पू. फडकेआजी या गुरु-शिष्य जोडीला आम्हा सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक अन् भावपूर्ण नमस्कार !’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (प.पू. विमल फडके यांची मुलगी) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०२१)


प.पू. फडकेआजींनी जतन केलेल्या १९ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर समर्पित केलेल्या फुलांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

सौ. मधुरा कर्वे

‘८.१२.२०२१ या दिवशी या फुलांच्या छायाचित्राची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या फुलांमध्ये नकारात्मक ऊर्जा नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे. छायाचित्रातील डाव्या बाजूकडील फुलातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १५.४० मीटर आणि उजव्या बाजूकडील (पाकळ्या गळलेल्या) फुलातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १६.५५ मीटर आहे. सर्वसाधारणपणे फुलांचे आयुष्य जेमतेम १ – २ दिवसांचे असते. त्यानंतर ती कोमेजतात. प.पू. फडकेआजींनी जतन केलेल्या फुलांमध्ये १९ वर्षांनंतरही चैतन्य टिकून आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.१२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक