अमरावती येथे प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणार्या ३ धर्मांधांना अटक !
अशांना कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक
अमरावती, १० डिसेंबर (वार्ता.) – पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ७ डिसेंबर या दिवशी लोहाबाजार गल्लीतील अशर्फी सेल्स या दुकानावर धाड टाकून १ लक्ष ७८ सहस्र ९३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा कह्यात घेतला.
या वेळी दुकानाचा मालक मोहम्मद हारुन मोहम्मद ईब्राहिम याच्यासह कामरान पठाण आणि लादेन खान सलीम खान या २ कामगारांना गुटख्याची अवैधरित्या विक्री करतांना पोलिसांनी अटक केली. (प्रत्येक गुन्ह्यात अल्पसंख्यांक आघाडीवर असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी या वेळी पोलिसांना साहाय्य केले.