आज संरक्षणदलप्रमुख बिपिन रावत आणि अधिकारी यांना सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात श्रद्धांजली वहाणार !
सांगली – तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेले देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ‘ब्रिगेडियर’ एल्.एस्. लीडर, लेफ्टनंट कर्नल एच्.सिंग, विंग कमांडर पी.एस्. चौहान, ‘स्वॉड्रन लीडर’ के. सिंग, जेडब्लूओ दास, ‘डब्लूओ’ प्रदीप ए., हवालदार सतपाल नाईक, गुरुसेवक सिंग, नाईक जितेंदर, लान्सनायक विवेक, लान्सनायक एस्.तेजा यांना ११ डिसेंबर या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ पर्यंत जाहीर श्रद्धांजली वहाण्यात येणार आहे. विलिंग्डन महाविद्यालय आणि भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम विलिंग्डन महाविद्यालयात होणार असून सर्व नागरिकांसाठी खुला आहे. कार्यक्रमासाठी येणार्या आजी-माजी सैनिकांनी ‘प्रोटोकॉल’प्रमाणे ‘मेडल्स/ मिनिएचर मेडल्स’ आणि ‘हेड गिअर’ या वेशभूषेत उपस्थित रहावे. नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.