सात्त्विक कृतींची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी (वय ३ वर्षे) !
‘पुणे येथील चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी (वय ३ वर्षे) याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (९.१२.२०२१) या दिवशी तिसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याची आई सौ. रमणी हृषिकेश कुलकर्णी यांना जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. चि. अभिराम हा सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांचा नातू (मुलीचा मुलगा) आहे.
(वाचकांना निवेदन : ९.१२.२०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात चि. अभिराम कुलकर्णी याचा दुसरा वाढदिवस असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्या ठिकाणी वाचकांनी ‘तिसरा वाढदिवस’ असे वाचावे. झालेल्या चुकीसाठी संबंधित दायित्वशून्य कार्यकर्ते प्रायश्चित्त घेत आहेत. – संपादक) |
(वर्ष २०१९ मध्ये चि. अभिराम कुलकर्णी याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. – संकलक)
१. वय : ११ मास ते १ वर्ष
१ अ. टाळ वाजवत असतांना ‘ऐकत रहावे’, असे वाटून भावजागृती होणे : एकदा मी खोलीत बसले होते आणि अभिराम टाळ (झांज) घेऊन आला अन् माझ्या जवळ टाळ वाजवत बसला. तो टाळ इतका सुंदर वाजवत होता की, ते पाहून माझी भावजागृती झाली. मला ‘ते ऐकत रहावे’, असे वाटत होते.
१ आ. कोथिंबिरीची वडी दिल्यावर प्रथम स्वामी समर्थांच्या चित्राला भरवणे आणि नंतर स्वतः खाणे : आम्ही एकदा कोथिंबिरीच्या वड्या केल्या होत्या. त्याला ती पुष्कळ आवडली होती. तो स्वामी समर्थांच्या चित्राशी खेळत खेळत जेवत होता. मग मी त्याच्या हातात एक वडी दिली. त्याने ती वडी प्रथम स्वामी समर्थांना भरवली आणि मग स्वतः खाल्ली. मी त्याला म्हणाले, ‘‘तू त्यांना आवडली का ?’, असे विचार.’’ त्याने लगेचच स्वामींच्या चित्राकडे पाहून मान वाकडी करून त्यांना विचारले आणि हसून स्वामींच्या चित्राची पापी घेतली.
२. वय : १ वर्ष ते १ वर्ष ६ मास
२ अ. एकदा पाहिलेली गोष्ट लक्षात ठेवून तशी कृती करणे : एकदा मी आणि अभिराम खेळत होतो. मध्येच तो डोळे मिटून बोबड्या आवाजात म्हणाला, ‘‘आई, ‘नारायण.. नारायण.’’ त्या वेळी मला काही कळले नाही. नंतर संध्याकाळी आम्ही ‘विष्णुपुराण’ पहातांना भक्त प्रल्हाद ‘नारायण, नारायण’ असा जप करतांना पाहिल्यावर त्याला पाहून त्याच्याप्रमाणेच हात जोडून तो ‘‘नारायण’’, असे म्हणाला.
३. वय : १ वर्ष ७ मास ते १ वर्ष १० मास
३ अ. भाव
३ अ १. स्वतः जेवतांना गणपतीलाही जेवणाविषयी विचारणे : आमच्याकडे १० दिवसांचा गणेशोत्सव असतो आणि गौरीपूजनाचे व्रतही असते. एकदा अभिराम श्री गणेशमूर्तीसमोर जेवायला बसला आणि म्हणाला, ‘बाप्पा, मम्म (जेवण) केली का ? बाप्पा पापा (पोळी) हवा का ?’
३ अ २. भावपूर्ण पूजा करणे : त्याला दसर्याला पाटी आणली आणि पाटीपूजन करण्यास सांगितले. तो पाटीपूजन भावपूर्ण आणि मनापासून करत होता. त्याची ती पूजा पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
– सौ. रमणी हृषिकेश कुलकर्णी (चि. अभिरामची आई), पुणे (४.२.२०२१)