नगर येथील ‘सन फार्मा’ आस्थापनाला आग, एका कामगाराचा मृत्यू !
नगर – येथील एम.आय.डी.सी. मधील ‘सन फार्मा’ या औषधे निर्माण करणार्या आस्थापनातील ‘लिक्विड’ प्रकल्पाशेजारील खोलीला ८ डिसेंबरच्या रात्री १० वाजता आग लागली. एम्.आय.डी.सी. आणि महापालिकेतील अग्नीशमनदलाच्या ५ बंबांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले; परंतु या आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे समजते.