श्रीलंका सरकारच्या विरोधात चिनी आस्थापनाकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला प्रविष्ट
चिनी आस्थापनाकडून आयात केलेला माल गुणवत्ता चांगली नसल्याने अर्ध्या वाटेवरून परत पाठवला
चीनच्या एकूणच वस्तूंची गुणवत्ता सुमार असल्याचा अनुभव जगातील अनेक देशांनी आतापर्यंत घेतला आहे. चीनला श्रीलंकेने अशा प्रकारे माल परत पाठवून दिलेले उत्तर अन्य देशांना शिकण्यासारखे आहे !
कोलंबो (श्रीलंका) – चीनमधील खत निर्मिती करणार्या एका आस्थापनाकडून आयात करण्यात आलेला २० सहस्र टन माल श्रीलंका सरकारने मालाची गुणपत्ता चांगली नसल्याचे सांगत अर्ध्या वाटेवरूनच परत पाठवून दिला.
#GTexclusive: Chinese firm Seawin Biotech has initiated international arbitration in Singapore after #SriLanka rejected its fertilizer shipment and efforts to reach a deal. https://t.co/lNHEzaZ9h2
— Global Times (@globaltimesnews) December 7, 2021
यामुळे संतप्त चिनी आस्थापनाने श्रीलंकेच्या सरकारच्या विरोधात सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.