उत्साही आणि चैतन्यदायी असणार्या श्रीमती विजया दीक्षितआजी यांना पाहून साधिकेला त्या संत असल्याचे जाणवणे !
१. श्रीमती दीक्षितआजींना पाहून ‘कोणीतरी संत बसल्या आहेत’, असे वाटणे
‘६.११.२०२१ या दिवशी सायंकाळी भोजनकक्षाच्या बाहेर सौ. कणगलेकरकाकू आणि त्यांच्या समवेत एक आजी बसल्या होत्या. मी त्यांना पाहिले आहे; पण त्यांनी मुखपट्टी (मास्क) घातली असल्याने मी त्यांना ओळखले नाही. त्या वेळी ‘कोणीतरी संत बसल्या आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी कणगलेकर काकू म्हणाल्या, ‘‘माझी आई आहे.’’
२. श्रीमती विजया दीक्षितआजी या प्रवासातून आलेल्या असूनही इतक्या उत्साही आणि चैतन्यदायी वाटत होत्या. तेव्हाच मला वाटले, ‘या लवकरच संत होतील.’
३. श्रीमती दीक्षितआजींचा स्पर्श मुलायम वाटणे
सायंकाळच्या प्रसादानंतर मी त्यांचा हात धरून त्यांना खोलीत घेऊन आले. त्यांचा स्पर्श इतका मुलायम होता की, त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. त्या वेळी ‘थोडा वेळ त्यांचा हात धरून बसावे’, असे मला वाटत होते.’
– रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(८.११.२०२१)