तुर्भे येथे आगीत ४५ बीएम्डब्ल्यू गाड्या जळून खाक !
नवी मुंबई – तुर्भे औद्योगिक वसाहतीतील ‘बीएम्डब्ल्यू वर्कशॉप’ला ७ डिसेंबर या दिवशी भीषण आग लागली होती. या आगीत ४५ बीएम्डब्ल्यू गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वित्तहानी पुष्कळ झाली आहे. तुर्भे पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. एम्आयडीसीसह कोपरखैरणे, नेरूळ आणि शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी ६ घंट्यांचा अवधी लागला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.