संतांकडे सकाम साधना करणारे सहस्रो भक्त असतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी फारतर १ – २ शिष्यच असतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘बहुतांश संत हे व्यष्टी प्रकृतीचे असतात. ते मानसिक स्तरावर राहून येणार्‍यांची व्यावहारिक दुःखे दूर करण्यावरच भर देतात. ते त्यांच्याकडे येणार्‍यांकडून ईश्वरप्राप्तीसाठी साधना करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांमध्ये ‘स्वतःच्या व्यावहारिक अडचणी सुटाव्यात’, यासाठी येणार्‍या भक्तांचीच संख्या अधिक असते. त्या संतांकडून साधना शिकून शिष्य पदापर्यंत पोचणारे क्वचितच १ – २ जणच असतात. बर्‍याचदा संतांच्या पश्चात त्यांच्या गादीवर बसायला योग्य कोणी नसल्यामुळे तेथे केवळ त्या संतांच्या पादुकांचीच स्थापना करावी लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.११.२०२१)