खटाव (सांगली) येथील श्रीयल्लम्मा देवीच्या यात्रेस केवळ धार्मिक विधी आणि नैवेद्य कार्यक्रमास अनुमती ! – तहसीलदार
सांगली, ८ डिसेंबर – मिरज तालुक्यातील मौजे खटाव येथे ७ ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार्या श्रीयल्लम्मा देवीच्या यात्रेत केवळ धार्मिक विधी आणि नैवेद्य कार्यक्रमास अनुमती देण्यात आली आहे. या यात्रेत शासनाने केलेल्या सूचनांचे पालन भाविकांनी करावे आणि शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मिरज तहसीलदार डी.एस्. कुंभार यांनी केले आहे.