दासबोध अध्ययन मंडळाच्या वतीने मिरज येथे ९ डिसेंबरला दासबोध स्नेहमेळावा !
मिरज, ६ डिसेंबर (वार्ता.) – श्रीसमर्थ सेवा मंडळ संचलित श्रीमद़् ग्रंथराज दासबोध अध्ययन यांच्या वतीने मिरज येथे ९ डिसेंबर या दिवशी दासबोध स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ब्राह्मणपुरी येथील भानु तालीमसमोर असलेल्या काशीविश्वेश्वर देवालय येथे दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. हा मेळावा समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ, श्री. शामराव साखरे, अनुराधाताई मोडक, सौ. ज्योति कोरबू यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून या मेळाव्यास श्री. शरदबुवा रामदासी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या मेळाव्यास सर्व समर्थभक्त, श्रीदासबोधप्रेमी, वाचक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.