स्वित्झर्लंडमधील रोमन कॅथॉलिक चर्च यापूर्वी झालेल्या लैंगिक शोषणाचा अभ्यास करणार : दोन शिक्षणतज्ञांकडे दायित्व !
यातून हे स्पष्ट होते की, चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात मुले, तरुणी आणि महिला यांचे लैंगिक शोषण झाले आणि होत आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात असे होत आहे का ? याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारतीय प्रसारमाध्यमे याकडे लक्ष देणार नाहीत, हेही तितकेच सत्य आहे ! – संपादक
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – स्वित्झर्लंडमध्ये रोमन कॅथॉलिक चर्च २० व्या शतकाच्या मध्यापासून ते स्विस चर्चमधील लैंगिक शोषणाच्या इतिहासापर्यंतचा अभ्यास करणार असून त्यासाठी २ शिक्षणतज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्यूरिच विश्वविद्यालयातील इतिहासाच्या मोनिका डोमन आणि मारिएटा मायर अशी या शिक्षणतज्ञांची नावे आहेत.
The Swiss bishops’ conference and the nation’s conference of religious orders have commissioned an independent study of sexual abuse cases within the Catholic Church in the country during the second half of the 20th century.https://t.co/Jmef4uw8pS
— NCR (@NCRonline) December 7, 2021
बिशपच्या संघटनेने याविषयी सांगितले की, रोमन कॅथॉलिक चर्चकडूनच वरील काळात झालेल्या लैंगिक शोषणांमुळे असंख्य लोकांना अत्याचार सहन करावे लागले आहेत. अशा पीडितांचे दुःख हलके करण्यासाठी आणि भविष्यात लोकांना धडा मिळण्यासाठी हा अभ्यास करणे आवश्यक आहे.