काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार
कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याचीही माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते ! – संपादक
नवी देहली – जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित केल्यानंतर काश्मीरमधून एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एक लेखी उत्तरात दिली. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी हे कलम हटवण्यात आले होते.
‘After abrogation of Article 370, no Hindu has been displaced from the Valley’: Union Home Ministry in Rajya Sabhahttps://t.co/EWpfq7X9EH
— OpIndia.com (@OpIndia_com) December 8, 2021
नित्यानंद राय म्हणाले की, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार कलम ३७० हटवल्यानंतर येथे एकही दंगल झाली नाही. हे कलम रहित केल्यापासून, म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ पासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात ३६६ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले, तर ८१ सैनिक हुतात्मा झाले. त्या वेळी ९६ लोकांचा मृत्यू झाला.