भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ? – उत्तरप्रदेशचे दुग्धविकास मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण

उजवीकडे दुग्धविकास, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण

मथुरा (उत्तरप्रदेश) – भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ?, असा प्रश्‍न उत्तरप्रदेशचे दुग्धविकास, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी केला. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि अन्य मंत्री यांनी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीवर श्रीकृष्ण मंदिर बांधण्याविषयीचे विधाने केली होती. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला चौधरी लक्ष्मी नारायण यांनी वरील उत्तर दिले.

चौधरी लक्ष्मी नारायण पुढे म्हणाले की, सध्याच्या स्थितीत ज्या ठिकाणी ईदशाह मशीद आहे, तेथे पूर्वी कंसाचा कारागृह होता आणि त्यात बंद असणार्‍या देवकी आणि वासुदेव यांनी त्यांच्या आठव्या बालकाला अर्थात् श्रीकृष्णाला जन्म दिला होता. त्यामुळे आम्ही तेथेच श्रीकृष्ण मंदिर बांधणार आहोत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म तेथे झाला असल्याने मंदिरही तेथेच बांधले गेले पाहिजे.