स्वित्झर्लंड सरकारकडून इच्छामरण देणार्या यंत्राला कायदेशीर मान्यता
यंत्राच्या साहाय्याने कोणत्याही त्रासाविना एका मिनिटात होणार मृत्यू
बर्न (जर्मनी) – स्वित्झर्लंडमध्ये वर्ष १९४२ पासून इच्छामरण कायदेशीर आहे. स्वित्झर्लंड सरकारने आता ‘इच्छामरण यंत्रा’ला (‘सुसाइड पॉड’ला) कायदेशीर मान्यता दिली आहे. या यंत्राच्या साहाय्याने गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदना न होता ते शांतपणे मृत्यू स्वीकारू शकतात. हे यंत्र बनवणार्या आस्थापनाने सांगितले की, यंत्रामधील ऑक्सिजनची पातळी अत्यंत न्यून केली जाते, ज्यामुळे एका मिनिटाच्या आत व्यक्तीचा मृत्यू होतो. शवपेटीच्या आकाराच्या या यंत्राचे नाव ‘सरको’ आहे. यंत्राच्या आत असलेली व्यक्ती डोळे मिचकावूनही हे यंत्र चालवू शकते. ज्या रुग्णांना आजारपणामुळे हालचाल करता येत नाही, त्यांच्यासाठी हे यंत्र उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. अनेक लोकांनी ‘हे यंत्र आत्महत्या करण्याला प्रोत्साहन देईल’, असे सांगत या यंत्राला विरोध केला आहे.
Switzerland’s medical review board has authorized the use of the Sarco Suicide Pod, which is a 3-D-printed portable coffin-like capsule with windows that can be transported to a tranquil place for a person’s final moments of life. https://t.co/mE8IzkxEsA
— The Daily Beast (@thedailybeast) December 7, 2021