वर्ष २०१८ पासून २ सहस्र रुपयांच्या नोटांची छपाई नाही ! – केंद्र सरकार

केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी

नवी देहली – केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या २ सहस्र रुपयांच्या केवळ १.७५ टक्के नोटाच चलनात आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून २ सहस्र रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांना राज्यसभेत एका लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. ‘वर्ष २०१८ पासून छापखान्याकडे या नोटांच्या छपाईसाठी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही’, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.