धर्मांधाने हिंदु बनून युवतीशी लग्न केले आणि लैंगिक शोषण करून तिला सोडून दिले !
धर्मांतरासाठी युवतीला मारहाण केली, तसेच धमक्या दिल्या !
|
सुलतानपूर (उत्तरप्रदेश) – फहीम कुरेशी याने हिंदु बनून एका तरुणीशी लग्न केले. त्यानंतर तो तिला इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण करू लागला, तसेच त्याने तिला फसवून तिचा अनेक वेळा गर्भपात केला. पीडितेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर तो तिला सोडून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी फहीम कुरेशी याला अटक करण्यात आली आहे.
१. माध्यमांच्या माहितीप्रमाणे फहीम कुरेशी हा सुलतानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पीडिता ही दरियापूर येथील रहाणारी आहे. वर्ष २०१८ मध्ये त्याने हिंदु धर्म स्वीकारून पीडितेशी लग्न केले. वर्ष २०१९ मध्ये पीडिता गर्भवती राहिल्यानंतर फहीमने फसवून तिला गर्भपाताचे औषध खाण्यास दिले.
२. याविषयी पीडितेने फहीमच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांनी दोघांमध्ये अंतर्गत तडजोड घडवून आणली. त्यानंतर फहीम पीडितेला घेऊन जौनपूर येथे गेला. तेथे परत एकदा पीडिता गर्भवती झाली. तेव्हा फहीमने मुलाला स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी त्याने पीडितेला तेथे सोडून पळ काढला.