ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे घाबरून जाऊ नका ! – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आवाहन

६ जणांना संसर्ग

राजेश पाटील

पिंपरी – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ओमिक्रॉनचा शहरातील ६ जणांना संसर्ग झाला आहे. त्यातील एका रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आहेत, तर इतर ५ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. ओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी महापालिकेने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना प्रतिबंधात्मक लस, मास्क आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासियांना केले आहे.