सोलापूर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने श्रीराम मंदिरात शौर्यदिन साजरा !
सोलापूर – अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्यापासून प्रतिवर्षी ६ डिसेंबरला विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अयोध्येसह देशभरात शौर्य दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ६ डिसेंबर या दिवशी दाजी पेठ आणि लष्कर येथील प्रभू श्रीराम मंदिरात महाआरती करत शौर्यदिन साजरा करण्यात आला.
दाजी पेठ येथील श्रीराम मंदिरात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम्, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, विश्व हिंदू परिषद प्रांताचे मठ मंदिर सहप्रमुख संजय कुलकर्णी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते, तर लष्कर भागातील श्रीराम मंदिरात बजरंग दलाचे अंबादास गोरंटला यांच्यासह अन्य उपस्थित होते.