उपाधीप्रमाणे कायमस्वरूपी पदव्या देणारी सध्याची शिक्षणव्यवस्था अन् साधकांच्या वर्तमान स्थितीनुसार पदवी घोषित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सध्याच्या शैक्षणिक पद्धतीनुसार अधिवक्ता, वैद्य, अभियंता होण्यासाठीचा अभ्यासक्रम एखाद्याने पूर्ण केल्यावर त्याला विद्यापिठाकडून तसे प्रमाणपत्र दिले जाते. पुढे त्या पदवीधारकाने त्याच्या शिक्षणानुसार कार्य केले नाही, तर सदर विद्यापीठ त्याची पदवी परत घेत नाही. त्याच्याकडे ती पदवी एखाद्या उपाधीप्रमाणे आयुष्यभर असते. याउलट महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून आध्यात्मिक स्तरानुसार पदवी दिली देते. काही कारणास्तव एखाद्याचा आध्यात्मिक स्तर न्यून झाल्यास विश्वविद्यालय तसे घोषित करते आणि त्याला पुन्हा त्या पदवीसाठी साधना करण्यास सांगते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.११.२०२१)