हिंदूंनी महादेव मंदिरात आरतीसाठी प्रत्येक सोमवारी उपस्थित रहावे !
कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठांचे आवाहन !
हिंदूंच्या संघटनासाठी प्रयत्न करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! आरतीसाठी सर्वांनी एकत्रित येणे, हे धर्मकर्तव्यच आहे. – संपादक
कोल्हापूर, ५ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंचे संघटन होण्याच्या दृष्टीने त्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी पाण्याच्या खजिन्याच्या पिछाडीस भूमी अभिलेख कार्यालय समोरील महादेव मंदिरात प्रत्येक सोमवारी सायंकाळी ७ वाजता आरतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ श्री. राहुल कदम आणि श्री. रविराज चौगुले यांनी केले आहे. याच समवेत इचलकरंजी, हातकणंगले येथील हिंदूंनी ‘मॉडर्न हायस्कूल’ येथील महादेव मंदिर येथे आरतीसाठी सोमवारी सायंकाळी ७ वाजता यावे, असे आवाहन माजी सैनिक सुनील पाटीलसर यांनी केले आहे.