सातारा विभागात एस्.टी.चे ८०५ कर्मचारी कामावर उपस्थित !
सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी २९ दिवसांपासून एस्.टी. कर्मचार्यांचा संप चालू आहे; मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी शिवशाही बस चालू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सातारा बसस्थानकामध्ये प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. स्वारगेट आणि मुंबईकडे जाणार्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सध्या सातारा विभागात एस्.टी.चे ८०५ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली. सागर पळसुले म्हणाले, ‘‘प्रवाशांच्या मागणीनुसार शिवशाही बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सातारा विभागात खासगी शिवशाही ४८ बस, तर साध्या एस्.टी.च्या ९२ फेर्या चालू झाल्या आहेत.