प्रभाग रचनेच्या कच्च्या प्रारूप आराखडयाचे काम अंतिम टप्प्यात !
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक
पिंपरी (पुणे) – महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते; मात्र राज्यातील वाढती लोकसंख्या आणि नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिका आणि नगर परिषद यांमधील सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतवाढीत आराखडा सिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करणार आहे, असे निवडणूक विभागातील अधिकार्यांनी सांगितले.