कोल्हापूर येथे रेल्वेच्या डब्याला लागली आग !
कोल्हापूर – येथील रेल्वेस्थानकात थांबलेल्या रेल्वे डब्याला ५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजता आग लागली. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागली होती आणि यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या आगीत रेल्वेचा डबा पूर्णपणे जळून गेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर काही वेळातच अग्नीशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले आणि त्यांनी आग विझवली.