नेरे (पनवेल) येथे श्री साईबाबा प्राणप्रतिष्ठा २० वा वर्धापनदिन सोहळा
पनवेल – येथील नेरे गावात श्री साईबाबा प्राणप्रतिष्ठा २० वा वर्धापनदिन सोहळा ६ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात काकड आरती, अभिषेक, महिमा पारायण, श्री सत्यनारायणाची महापूजा, भजन, श्री साई बाबांची पालखी सोहळा, महाआरती, रात्री ८.३० वाजता ह.भ.प. महेश महाराज साळुंखे यांचे सुश्राव्य कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.