शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे समुद्रात बुडणार्‍या २ पर्यटकांना वाचवण्यात यश

वेंगुर्ला – तालुक्यातील शिरोडा येथील समुद्रात ४ डिसेंबर या दिवशी बुडणार्‍या मुंबई येथील दोघांना ‘सागर सुरक्षारक्षक’ संजय नार्वेकर आणि ‘राज स्पोर्ट’चे कर्मचारी यांनी वाचवले.

पर्यटकांची गर्दी शिरोडा समुद्रकिनार्‍यावर वाढू लागली आहे. ४ डिसेंबरला सायंकाळी किनार्‍यावर पर्यटकांची गर्दी होती. त्यातील काही पर्यटक अंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. पाण्यात उतरलेल्या पर्यटकांपैकी दोघेजण अंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्या वेळी त्यांना संजय नार्वेकर आणि ‘राज स्पोर्ट’चे कर्मचारी यांनी पाण्याबाहेर काढले.