(म्हणे) ‘ती लहान मुल आहेत, ती जोशात येतात आणि उत्स्फूर्तपणे असे काम करून मोकळी होतात !’
पाकच्या संरक्षणमंत्र्यांकडून श्रीलंकेच्या नागरिकाची हत्या करणार्याला पाठीशी घालणारे वक्तव्य
असे राज्यकर्ते असणार्या देशात निरपराध्यांच्या हत्या होणार नाहीत, तर काय होणार ? याचा विचार करून जागतिक समुदायाने पाकला बहिष्कृत करणे, हाच एकमेव उपाय ! श्रीलंकेने आणि भारताने तरी हा निर्णय घेतला पाहिजे ! – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून धर्मांधांच्या जमावाने श्रीलंकेचे नागरिक प्रियांथा कुमार यांची अमानुष हत्या केली होती. या घटनेविषयी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री परवेज खटक यांनी मारेकर्यांना पाठीशी घालणारे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘‘ती लहान मुल आहेत, ती जोशात येतात आणि उत्स्फूर्तपणे असे काम करून मोकळी होतात. याचा अर्थ ‘देश विनाशाच्या मार्गावर जात आहे’, असा होत नाही. प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत. (पाकच्या राज्यकर्त्यांनी कितीही नाकारले, तरी पाक विनाशाकडे वाटचाल करत आहे आणि ज्या दिवशी पाकचा विनाश होईल, तेव्हा या राज्यकर्त्यांचाही विनाश होणार, हेच सत्य आहे ! – संपादक)
‘Some kids got angry’: Pakistan Defence Minister finds excuses for the lynching of Sri Lankan man over ‘blasphemy’ allegationshttps://t.co/C2bn2vZ42P
— OpIndia.com (@OpIndia_com) December 6, 2021