आडवली गावातील श्री देव रवळनाथ मंदिरातील दानपेटी फोडून चोरी
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
मालवण – तालुक्यातील आडवली गावातील श्री देव रवळनाथ मंदिरातील दानपेटी फोडून आतील रक्कम चोरल्याची घटना ३ डिसेंबर या दिवशी सकाळी उघड झाली. आडवली गावातील श्री देव रवळनाथ मंदिरात नुकताच धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. त्यामुळे दानपेटीत रोख रक्कम जमा झालेली होती. ३ डिसेंबर या दिवशी गावातील एक ग्रामस्थ मंदिरात गेले असता त्यांना दानपेटी फोडलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे त्यांनी आचरा पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.