काँग्रेसकडे ९ मतदारसंघांत उमेदवारीसाठी एकच नाव आले, तर फोंड्याचे आमदार रवि नाईक यांना सूचीतून वगळले
पणजी – काँग्रेस पक्षाकडे फोंडा, कुंकळ्ळी, ताळगाव, मडगाव, डिचोली, मये, मुरगाव, दाबोळी आणि कुठ्ठाळी या एकूण ९ मदारसंघांसाठी एकाच उमेदवाराचे नाव आले आहे. विशेष म्हणजे या सूचीत फोंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवि नाईक यांच्या नावाचा समावेश नाही. फोंडा गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष जॉन परेरा यांच्या मते समितीने फोंडा मतदारसंघासाठी राजेश शेट वेरेकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.