(म्हणे) ‘कुटुंबव्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्यसाठी मारक !’
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘भाषा, लेखक आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादात ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या ‘वेबपोर्टल’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांच्याकडून भारतीय संस्कृतीला छेद देणारे विधान
|
नाशिक – व्यक्तीस्वातंत्र्य हा लोकशाहीचा गाभा आहे. महात्मा गांधी इंग्रजांविषयी म्हणायचे की, तुम्ही स्वातंत्र्य देणारे कोण ? आमचे आम्ही स्वतंत्र आहोत. व्यक्तीस्वातंत्र्याविषयी ही आत्मविश्वासाची भावना लोकशाहीत असायला हवी. असा आत्मविश्वास आपल्यात आहे का ? कुटुंबव्यवस्था ही व्यक्तीस्वातंत्र्यासाठी मारक आहे, असे उथळ विधान ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या ‘वेबपोर्टल’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘भाषा, लेखक आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर लेखक रवींद्र पंढरीनाथ, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, डॉ. दीपक पवार, पत्रकार इब्राहिम अफगाण आणि पत्रकार दीप्ती राऊत उपस्थित होते.
गांगल यांच्या कुटुंब व्यवस्थेच्या विरोधातील वक्तव्याचे पत्रकार दीप्ती राऊत यांच्याकडून खंडन !दिनकर गांगल यांनी त्यांच्या भाषणात ‘कुटुंबव्यवस्था लोकशाहीला मारक आहे’, असे कुटुंबव्यवस्थेला दूषण देणारे वक्तव्य केले. याला दैनिक ‘दिव्य मराठी’च्या पत्रकार दीप्ती राऊत यांनी त्यांच्या भाषणात ‘कुटुंबव्यवस्थेमुळेच खर्या अर्थाने लोकशाही बळकट होते’, असे नम्रतेने सांगून दिनकर गांगल यांच्या वक्तव्याचे खंडन केले. |