खोलीची शुद्धी करतांना आणि स्वतःची दृष्ट काढतांना वापरलेल्या करवंट्यांमध्ये शुभचिन्हे उमटणे
‘१८.१२.२०१९ या दिवशी खोलीची शुद्धी करतांना मी नारळाच्या २ करवंट्या आणल्या होत्या. एका करवंटीमध्ये खोलीची शुद्धी केलेला कापूर जाळला आणि दुसर्या करवंटीमध्ये कापराने स्वतःची दृष्ट काढल्यावर तो जाळण्यासाठी ती करवंटी वापरली होती.
१. पहिल्या दिवशी खोलीची शुद्धी करतांना कापराचे तुकडे करवंटीत घालून खोलीची शुद्धी केली. त्या वेळी करवंटीवर ‘ॐ’ उमटल्याचे लक्षात आले.
२. कापराने स्वतःची दृष्ट काढायला वापरलेल्या करवंटीवर ‘ॐ’ आणि स्वस्तिक उमटणे
अ. मी कापराने स्वतःची दृष्ट काढण्यासाठी दुसरी करवंटी वापरली. कापूर जळल्यावर तिच्यावर ‘ॐ’ उमटल्याचे माझ्या लक्षात आले.
त्याच करवंटीमध्ये मी अनेकदा स्वतःची दृष्ट काढली आहे. तेव्हा त्या करवंटीमध्ये अनेक ‘ॐ’ उमटल्याचे माझ्या लक्षात आले.
आ. एकदा पुन्हा दृष्ट काढल्यावर करवंटीमध्ये ‘स्वस्तिक’ उमटल्याचे माझ्या लक्षात आले.
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०२०)
कु. रजनीगंधा कुर्हे : मी ‘माझा त्रास अल्प व्हावा’, यासाठी स्वतःची दृष्ट काढत होते; मात्र त्यावर शुभचिन्हे का उमटली असावीत ? मला त्या वेळी दृष्ट लागली नव्हती; म्हणून का ?
एक संत : त्रास न्यून व्हावा; म्हणून आलेल्या दैवी शक्तीची ती चिन्हे होती.