किती लोकप्रतिनिधी जनतेला सन्मान देतात ?
‘लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना शासकीय कार्यालय आणि कार्यक्रम यांमध्ये योग्य तो सन्मान देऊन राजशिष्टाचाराचे पालन करावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकताच याविषयी शासकीय आदेश काढला आहे. यामध्ये शासकीय कार्यक्रमांच्या पत्रिकेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव देणे, शासकीय कार्यक्रमांमध्ये त्यांना निमंत्रित करणे, त्यांनी पाठवलेल्या पत्रांना योग्य आणि समर्पक उत्तरे वेळेत देणे, लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात आल्यास त्यांना योग्य तो सन्मान देणे आणि त्यांना अभिवादन करणे आदी अनेक उपचार राजशिष्टाचारामध्ये येत असून त्यांचे प्रशासकीय अधिकार्यांनी पालन करावे. तसे न करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तंबीही आदेशात देण्यात आली आहे. यापूर्वीही वर्ष २०१४ मध्ये अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने आदेश काढला होता; मात्र काही लोकप्रतिनिधींकडून आलेल्या तक्रारींमुळे सरकारला पुन्हा याविषयीचा आदेश काढावा लागला.’ (२८.११.२०२१)