परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या बेळगाव येथील सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी (वय ८९ वर्षे) !
बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षितआजी (वय ८९ वर्षे) सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१७.११.२०२१) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केली. या सोहळ्याच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि अन्य सूत्रे आज पाहूया.
एकाच वेळी अनेक प्रकारच्या भावस्थिती अनुभवणार्या पू. दीक्षितआजी !
सन्मान सोहळ्यात आजींच्या विविध भावस्थितींचे दर्शन झाले. ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी साधनेत कसे पुढे पुढे नेले’, याचे भावपूर्ण कथन करत असतांना मध्येच काही आठवले, तर पू. आजी स्वतःच्या साधनेतील काही अनुभव अथवा अनुभूती सांगत होत्या.
काही वेळा पू. आजी बोलत असतांना त्यांच्यातील गोपीभाव जाणवला. पू. आजी आणि श्रीकृष्ण एवढेच त्यांचे विश्व असल्याचे त्या क्षणी जाणवले. सन्मान सोहळ्यात पू. आजींचा कृतज्ञताभावही जाणवत होता. ‘श्रीगुरूंनी माझ्यासाठी किती केले ?’, हे कृतज्ञतापूर्वक सांगत असतांनाच त्यांचा शरणागतभावही जागृत झाला. सन्मान झाल्यानंतर गुरुदेवांविषयीचे काव्य गात असतांना पू. आजींची पुष्कळ भावजागृती झाली. नंतर त्या लगेच स्थिर झाल्या आणि सहजतेने विचारले, ‘‘(कविता) चांगली वाटली का ?’’
पू. दीक्षितआजी यांनी असे विचारल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी पू. आजींचे वैशिष्ट्य उलगडले. एकाच वेळी अनेक प्रकारच्या भावस्थितींचे दर्शन पू. आजींच्या माध्यमातून घडते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘पू. आजींचे भाव किती लगेच पालटतात ना ! एका आध्यात्मिक स्थितीतून परिस्थितीनुसार दुसर्या आध्यात्मिक स्थितीत सहजतेने प्रवेश करणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’’
‘भगवंताविषयी भावपूर्ण बोलत असतांना मध्येच त्यांना आलेले साधनाविषयक अनुभव सांगणे, हे त्यांना मध्येच काही आठवल्यामुळे नसते, तर बोलता बोलता पू. आजी शिवदशेतून जीवदशेत आल्यामुळे शक्य होते’, असे विश्लेषण सनातनच्या सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी केले.
क्षणचित्र
२७.७.२०२० या दिवशी पू. डॉ. नीलकंठ दीक्षित यांचा देहत्याग झाल्यावर ‘पू. दीक्षितआजोबांनी दाखवलेल्या वाटेवर आपल्यालाही पुढे जायचे आहे’, असे श्रीमती दीक्षितआजी यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे खरोखरच सव्वा वर्षामध्ये पू. आजीही संतपदी विराजमान झाल्या.
मिल गया मुझे दिव्य आशीष गुरुदेव का ।मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आश्रमात येण्यास मिळाले आणि त्यांची भेट झाली. त्यानंतर माझा वाढदिवस आश्रमात साजरा करण्याचा निरोप मिळाला. हे सर्व अनमोल क्षण मला अनुभवायला मिळत आहेत, यासाठी मनात कृतज्ञताभाव दाटून येऊन मला पुढील ओळी स्फुरल्या. त्या त्यांच्याच चरणी अर्पण करते आणि प्रार्थना करते की, त्यांनी मला त्यांच्या चरणी घ्यावे. मिल गया लाख मोल का । कभी सुनते मेरे कान । गुरुदेव की अमृत बानी (टीप २)। जब भी मूंदती मेरी पलकें । वे हौले से (टीप ४) मुझसे बोले । मेरे मन में छवि गुरुदेव की । पंचारती करूं प्राणों की । टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले – श्रीमती विजया नीलकंठ दीक्षित, बेळगाव (१४.११.२०२१) |
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. दीक्षितआजी यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वेळोवेळी दिलेले आशीर्वाद१. दीक्षितआजी यांची प्रगती लवकर होण्यासंदर्भात परात्पर गुरुदेवांनी पूर्वीच सूचित केलेले असणे काही वर्षांपूर्वी आजी रामनाथी आश्रमात आल्या होत्या, त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी सांगितले होते की, ‘दीक्षितआजींची साधना चांगली चालू आहे. पू. दीक्षितआजोबा यांच्याप्रमाणे त्यांचीही प्रगती लवकर होईल.’ एप्रिल २०१९ मध्ये पू. आजींची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के होती. त्यानंतर केवळ अडीच वर्षांत त्या संतपदी विराजमान झाल्या आहेत. २. परात्पर गुरु डॉक्टरांचा पू. आजींना पुढील साधनेसाठी आशीर्वाद ! ‘पू. आजींची यापुढेही उन्नती जलद गतीने होईल. यापुढे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, तसेच समष्टीसाठी नामजप करण्याचे पुष्कळ कार्य देव त्यांच्याकडून करवून घेणार आहे’, असा आशीर्वाद परात्पर गुरुदेवांनी पू. आजींनी संतपद प्राप्त केल्याच्या निमित्ताने दिला आहे. – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ |
बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षितआजी यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती
‘ श्रीमती विजया दीक्षितआजी यांना पाहिल्यावर आणि त्यांचा आवाज ऐकल्यावर मला पुढील सूत्रे जाणवली.
१. त्यांना पाहिल्यावर ‘त्या संत झाल्या असून त्यांना ‘पू. दीक्षित आजी’, असे संबोधावे’, असे मला वाटले.
२. त्यांच्यामध्ये ईश्वरी चैतन्य कार्यरत असल्यामुळे त्यांची कांती पुष्कळ तेजस्वी झाल्याचे जाणवले.
३. त्यांचा आवाज ऐकल्यावर ‘त्यामध्ये पुष्कळ माधुर्य, प्रीती, विनम्रता आणि सहजता आहे’, असे जाणवले.
४. त्यांच्या सहवासात पुष्कळ आनंद जाणवत होता आणि त्यांना पाहून मला पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ झाला.
५. त्यांना पाहून माझे मन शांत झाले.
६. त्यांना पाहिल्यावर त्यांच्या डोक्याच्या मागे देवतांच्या मागे जशी प्रभावळ असते, तशी पिवळसर रंगाची प्रभावळ दिसली. यावरून ‘त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, हे सूत्र शिकायला मिळाले.
७. त्यांच्यामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांचे संमिश्र, म्हणजे ‘दत्ततत्त्व’ जाणवले. त्यामुळे त्यांच्यामध्ये दत्ततत्त्वाचे पिवळसर रंगाचे तत्त्व कार्यरत झाले. जेव्हा त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलत होत्या, तेव्हा मला परात्पर गुरुदेवांच्या पाठीमागे दत्तात्रेयाचे सूक्ष्मातून दर्शन झाले.
८. ‘त्या दत्तगुरूंच्या गुरुपरंपरेतील दत्तभक्त संत होणार आहेत’, असे मला देवाने सांगितले.
९. त्यांच्या माध्यमातून दत्तात्रेयाची ज्ञानशक्ती कार्यरत असल्याचे जाणवले.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले लवकरच त्यांचे संतपद घोषित करतील’, असे वाटले.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०२१)
(वरील लिखाणातील काही भाग पू. दीक्षितआजी संत घोषित होण्याआधीचा असल्याने त्यांच्या नावापुढे ‘पू.’ असा उल्लेख आलेला नाही. – संकलक)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |