कर्नाटक राज्यातील ख्रिस्त्यांचे रक्षण करा !
मेघालयातील भाजपचे मंत्री सनबोर शुलाई यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी
|
शिलांग (मेघालय) – मेघालय सरकारमधील भाजपचे एकमेव असलेले श्रम मंत्री सनबोर शुलाई यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कर्नाटकमध्ये रहाणार्या ख्रित्यांचे रक्षण करावे, अशी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारकडून राज्यातील ख्रिस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शुलाई यांनी या सर्वेक्षणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ‘अशा प्रकारचे सर्वेक्षण घटनाविरोधी असून राज्यातील ख्रिस्ती नागरिकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण करणारे आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. मेघालयात भाजपचे केवळ २ आमदार आहेत. राज्यात नॅशनल पीपल्स पार्टी आणि भाजप यांचे आघाडी सरकार आहे.
शुलाई यांनी या पत्रात म्हटले आहे, मी आपल्याला विनंती करतो की, कृपया कर्नाटकातील आर्चबिशप पीटर मचाडो आणि ख्रिस्ती पंथीय यांनी मांडलेल्या सूत्रांची नोंद घ्यावी. भारताची जागतिक स्तरावर ‘धर्मनिरपेक्ष’ अशी प्रतिमा असून अशा सर्वेक्षणामुळे ती मलिन होऊ शकते.
Meghalaya’s lone BJP minister Sanbor Shullai writes to PM Narendra Modi, urging him to ensure “safety and security” of Christians living in Karnataka
— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2021