ब्रिटनमध्ये शाळेने वर्गांत नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांचे थंडीत मैदानात नमाजपठण !
इस्लामी संघटना संतप्त ; शाळेकडून क्षमायाचना
कुठे स्वतःच्या धर्माचे कुठेही असले, तरी पालन करणारे मुसलमान विद्यार्थी, तर कुठे कॉन्व्हेंटमध्ये बांगड्या, कुंकू काढून टाकण्यास सांगितल्यावर आणि येशूची प्रार्थना करण्यास सांगितल्यावर त्यानुसार वागणारे भारतातील हिंदू ! – संपादक
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टर येथील ओल्डम अकॅडमी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांनी थंडीत मैदानात नमाजपठण केले. या नमाजपठणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यानंतर इस्लामी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. यावर शाळेने क्षमा मागितली आहे.
१. या विद्यार्थ्यांनी सांगितले की, जेवणाच्या सुटीमध्ये आम्ही वर्गात नमाजपठण करण्याचा प्रयत्न केल्यावर शिक्षकांनी बाहेर नमाजपठण करण्यास सांगितल्याने आम्ही बाहेर गेलो. अन्य एक विद्यार्थी म्हणाला की, आम्हाला वर्गांत नमाजपठण करण्याची अनुमती देण्यात आली नाही.
२. शाळेकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, पुरामुळे शाळेतील १५ वर्गांमध्ये पाणी शिरल्यामुळेच विद्यार्थी वर्गांमध्ये नमाजपठण करू शकले नाहीत.