दैनिक ‘सनातन प्रभात’च्या छपाईच्या संदर्भात सेवा करणार्या साधकांना जाणवलेली सूत्रे
१. श्री. संग्राम सुरेश पवार (वय २८ वर्षे), पुणे
१ अ. ‘मी गेली ३ वर्षे मुद्रणालयाशी संबंधित सेवा करतो. दूर अंतरावरून येणार्या सनातनच्या साधकांचे सेवेतील सातत्य पाहून त्यांच्यातील ‘त्याग’ हा गुण शिकायला मिळाला.’
२. श्री. गिरीश गुडी, पुणे
२ अ. ‘जिथे सनातन आहे, तिथे ईश्वर आहे. त्यामुळे जेथे दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई व्हायची, तेथील आस्थापनाचीही भरभराट होत होती, हे अनुभवण्यास आले.
२ आ. दैनिकाची छपाई करून देणारे कामगारही सेवाभावाने कृती करत असल्याचे जाणवणे : सनातनचे साधक सेवा म्हणून दैनिकाशी संबंधित कृती करत असल्याचे पाहून छपाई करणारे, तसेच संबंधित आस्थापनातील कामगार हेही दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित कृती आता सेवाभावाने करत असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसते.’
३. श्री रवींद्र अंबीलवादे, अंबड, जिल्हा जालना
३ अ. दैनिक न मिळाल्यास त्याविषयी आपुलकीने जाणून घेणारे ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार ! : ‘काही कारणास्तव दैनिकाचे वितरण करता न आल्यास वर्गणीदार चिडत किंवा रागावत नाही, उलट तेच आम्हाला आपुलकीने विचारतात, ‘‘आता बसचा संप आहे, तर काही अडचण आली का ? म्हणून दैनिकाचा अंक मिळाला नाही का ?’’ प्रत्येक वेळी ते सकारात्मक असतात.’